कोल्हापूर : पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांचा तोल गेला आहे. त्यातून ते छत्रपती घराण्यावर अशी वक्तव्य करीत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केले. त्यांच्या या अशा वक्तव्यामुळे त्यांची मते आणखी कमी होतील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जयंत पाटील म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा शाहू महाराजांवर नितांत प्रेम करणारा व त्यांचा आदर करणारा आहे. महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांना पराभव दिसत असल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. स्वतःकडे लक्ष वेधण्यासाठी अशी वादग्रस्त विधाने करीत आहेत. याचा अर्थ शाहू महाराजांनी निवडणुकीचे मैदान बरेच मारले आहे. त्यांचा विजय निश्चित आहे. त्यांनी लढाई जिंकली आहे. संजय मंडलिक यांच्या अशा या वक्तव्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले
