पोलीस तपासाच्या वास्तववादी शोधकथा
वाचक हो,
पत्रकार म्हणून काम करत असताना,२००४ साली, मी ज्या दैनिकात नोकरीस होते, त्या दैनिक तरुण भारतमध्ये, पोलिसांच्या कौशल्यपूर्ण आणि रंजक तपासावर आधारित, ” असा झाला तपास “ही कथा मालिका अडीच महिने चालवली. त्या कथांना उदंड प्रतिसाद लाभला. त्यामुळे या कथामालिकेचे रूपांतर पुस्तकात झाले. कर्तव्यदक्ष तडफदार आणि इमानदार पोलीस अधिकारी अशी ख्याती असणाऱ्या माजी पोलीस महासंचालक कै. अरविंद इनामदार यांच्या हस्ते या पुस्तकाचे शानदार प्रकाशन झाले होते. माहिती आणि तंत्रज्ञानाची, अत्याधुनिक आणि अद्यावत साधने नसताना, १९७० ते १९९० च्या दशकांमध्ये अतिशय आव्हानात्मक आणि क्लिष्ट गुन्ह्यांचा तपास पोलिसांनी कसा कौशल्यपूर्वक केला, त्याचे पूरक आणि यथार्थ वर्णन या कथांमध्ये आहे. वाचकांसाठी तेच “असा झाला तपास”हे पुस्तक आम्ही या पोर्टलवर, पुन्हा प्रकाशित करत आहोत.
मनोगत